vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज सादर करण्याकरिता दि.06 जून 2025 पर्यंत मुदतवाढ  

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज सादर करण्याकरिता दि.06 जून 2025 पर्यंत मुदतवाढ

ठाणे, प्रतिनिधी :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.युकयो-2012/प्र.क्र.65/क्रीयुसे-3,दि.12 नोव्हेंबर 2013 या शासन निर्णयान्वये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भूमिका, दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय समूह अशी ओळख समाजात झालेली आहे. युवांना मानव संसाधन विकासाचा मुख्य स्रोत म्हणून देखील मान्यता देण्यात आलेली आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. त्यानुषंगाने राज्याचे युवा धोरण-2012 मधील शिफारशीच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा पुरस्कार देण्यात येतात.

समाजातील दुर्बल घटक, अनुसूचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ., शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यसनमुक्ती इ. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था, युवक, युवती यांना जिल्हास्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येते.

त्यानुषंगाने ठाणे जिल्हा परिक्षेत्रातील वरीलप्रमाणे युवा व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक, युवती, तसेच संस्था यांना सन 2023-24 (कालावधी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024) व 2024-25 (कालावधी -1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025) या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम दि.30 मे 2025 अशी देण्यात आलेली होती. तथापि, जिल्ह्यातील युवांना पुरस्काराकरीता अर्ज सादर करण्याकरिता दि.06 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

धारावी विभागात भाजपाने केले ध्वजारोहण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप..

vishwatmaklokswamivarta

शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत…

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा