vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

1 मे पासून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळलेल्या 21 व्यावसायिकांकडून 1 लक्ष 5 हजार दंडवसूली व 103 किलो प्लास्टिक साठा जप्त

1 मे पासून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळलेल्या 21 व्यावसायिकांकडून 1 लक्ष 5 हजार दंडवसूली व 103 किलो प्लास्टिक साठा जप्त

 

         नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पपूर्तीसाठी व्यापक जनजागृती सोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराला आळा बसावा यादृष्टीने एकल वापर प्लास्टिक विरोधी कारवायाही करण्यात येत आहेत. 1 मे पासून 19 मे पर्यंत 21 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत 1 लक्ष 5 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून 103 किलो 400 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

   महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ 1 च्या भरारी पथकाने सहा दुकाने आस्थापना यांच्याकडून 30 हजार दंडात्मक वसूली तसेच 58 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे.

अशाचप्रकारे परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ भरारी पथकाने 15 दुकाने / आस्थापना यांच्याकडे प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने 75 हजार दंडात्मक रक्कमेची वसूली तसेच 45 किलो 400 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.

आज परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार से.1 कोपरखैरणे भागात केलेल्या तपासणी मोहीमेत जय गोगा मार्ट याठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने त्यांच्याकडून 5 हजार दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आली असून 1 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.

 16 मे रोजीही से.2 कोपरखैरणे येथील दर्शन सोलंकी यांच्या दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळल्याने तसेच 15 मे रोजी से.12 बोनकोडे येथे रॉयल इलेक्ट्रीक हार्डवेअर यांच्याकडेही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडील प्रत्येकी 1 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करुन प्रत्येकी 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई प्रत्यक्षात साकारण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

मुंबई तील गँगस्टर डी. व्हॉट. राव आणि इतर 6 जणांवर हॉटेल मालकाकडून 2.5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप, सर्वांना अटक..

vishwatmaklokswamivarta

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta