vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर तसेच आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, बार्शी (जि. सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिन तसेच नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा सोमवारी (दि.२२) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली.

 अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण आर. एम. शिंदे हे होते. प्रमुख पाहुणे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, ,डॉ. संदीप तांबारे, डॉ. बालाजी जाधव, डॉ. कविता आंधारे, उपस्थित होते.

 ‘नशामुक्त भारत अभियान मार्गदर्शक पुस्तिका’ चे प्रकाशन करण्यात आले. तसेच एनडीपीएस कायदा, व्यसनमुक्तीसाठी संतुलित आहार, संत साहित्याचा व्यसनमुक्ती संदेश, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसची कार्यपद्धती, मानसिक प्रशिक्षण आणि व्यसनप्रतिबंधक जीवनकौशल्ये या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले

सूत्रसंचालन सौ. अनुपमा शेटे यांनी केले. समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली.

या कार्यशाळेस राज्यभरातील २०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर तसेच आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

vishwatmaklokswamivarta

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे