vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

 

बुलढाणा,  (प्रतिनधी)सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी, सर्व राज्यांत “एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आह

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फॉँऊडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फॉँऊडेशन द्वारे चालवली जात आहे. या राष्ट्रीय हेल्पलाइनचा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे. जेष्ठांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी निसंकोचपणे “एल्डर लाईन 14567” या टोल फ्री हेल्पलाईन यावर संपर्क साधावा आणि www.elderline.dosje.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आह

……असे चालते काम वृध्दांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण व्हावे, म्हणून ही हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहास्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय व जनसेवा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत आठवड्यातील सातही दिवस चालणा-या या सेवेच्या माध्यतून वृध्दाश्रम व आरोग्याची माहिती, कायदेविषयक मार्गदर्शन, आर्थिक, पेन्शन संबधित सल्ला, भावनिक आधार, कौटुंबिक वाद निवारण, पोलिस मदत, सरकारी योजनांसह व हरवलेल्या जेष्ठांचा शोध घेण्याच्या सेवा पुरविल्या जातात.……..या तक्ररींचे केले जाते निवारण

सुन खावु घालत नाही, मुलगा परदेशी असल्याने सांभाळ करीत नाही, गर्दीच्या ठिकाणी हरविणे, उदनिर्वाहचा प्रश्न, एकटाच आहे, संपत्ती पैशासाठी मुलांकडून त्रास अशा समस्येवर संस्था जेष्ठांसाठी काम करते.

संबंधित पोस्ट

नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठीशहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस§ शहरांमधील परिवहन सेवेच्या विकासासाठी स्वतंत्र एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण§ प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करण्यापूर्वी हरकती, सूचना मागवा…

शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक-उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

vishwatmaklokswamivarta