vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तरुण वयात गोर-गरीब व समाजाच्या सुख-दु:खात उपयोगात येणाराच खरा नायक :जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

तरुण वयात गोर-गरीब व समाजाच्या सुख-दु:खात उपयोगात येणाराच खरा नायक :जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना, (प्रतिनिधी)-वाईट गोष्टी व कृत्ये तसेच हिरोगिरी करून स्वतःमध्ये नायक शोधणारे अनेक तरुण खर्‍या अर्थाने स्वतःला फसवत असतात.तर समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात मदत करणारे तरुणच खर्‍या अर्थाने समाजाचे नायक असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शहरातील शाकुंतल नगर भागातील मीनाक्षी हॉस्पिटल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आशिष बोकन यांनी डॉक्टर्स डे निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवनाथ जाधव, शहरप्रमुख बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर डॉ.नामदेव वाघ, डॉ.सुलोचना वाघ, डॉ.कैलाससचदेव, डॉ.सतीश शेकडे, डॉ.योगेश नेमाने यांचा यावेळी सत्कार करण्यातआला.पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले कि, इतरांचे सुख-दुःख आपले सुख-दुःख मानून त्यांच्यासाठी झटणारा इतरांसाठी आजारपणत,दर्घटनेत, अडी-अडचणी प्रसंगी व आनंदाच्या क्षणीही रहिवाशासोबत उभाराहणारा तरुण महत्वाचा आहे. कोणते तरी निमित्त शोधून लोकोपयोगी उपक्रमराबवून समाजाची सेवा करणारा तरुणच खर्‍या अर्थाने समाजाचा नायक असल्याचेजिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सांगितले व शिबिराच्या आयोजानाबद्दल आशिष बोकनयांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक आशिष बोकन यांच्यासह अक्षयबोकन,ज्ञानेश्वर केंद्रे, सागर बोकन, योगेश काळे आदींनी प्रयत्न केले.

००००००००००फोटो ओळी…..१०-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आशिष बोकन यांनीडॉक्टर्स डे निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगीजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह पदाधिकारी.

संबंधित पोस्ट

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

६ जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने …..आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन;*नाविण्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन द्या- गुलाब खरात *• पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी- मंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta