vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान

[ मुंबई प्रतिनिधी

अनेक वर्षापासून ज्या खेळाच्या मैदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे अशा धारावीतील एन शिवराजन मैदानात पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छता हवी या मागणीसाठी धारावी नागरिक समिती व झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट नंबर दोन यांच्या माध्यमातून व जी उत्तर उद्यान विभाग तसेच घनकचरा यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी 55 व्या जागतिक वृक्ष संवर्धन दिनी सकाळी आठ ते 11 या वेळात मैदानाची स्वच्छता वृक्षाभोवतीची झाडलोट दगड मातीचा निचरा वृक्षांना पाणी खत तसेच श्री मयूर कांबळे यांच्या माध्यमातून हास्य योगा नियमित व्यायाम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मंडळी सहभागी झाले होते

संवर्धन दिनी आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक घनकचरा विभाग श्री चंद्रकांत तांबे व कनिष्ठ वृक्ष अधिकारी श्रीमती स्वाती शेवडे यांच्यासह धारावी नागरिक समितीचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर अलका साबळे संदीप ढवळे आणि कनिष्ठ पर्यवेक्षक श्रीमती निरंजना जगताप मुकादम अशोक येवले व कामगार वर्ग उपस्थित होता या सर्वांच्या सहकार्यामुळेच वृक्ष संवर्धन दिनाच्या स्वच्छतेचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी किरण खंदारे अशोक काळे मीना गौतम श्री संजय सोनवणे व टीम यांचे सहकार्य लाभले सदर खेळाच्या उद्यानात नियमावलीचा बोर्ड लावावा कार्यक्रमानंतर आसपास पसरले साहित्य तातडीने उचलावे दुसऱ्या दिवशी युद्ध पातळीवर स्वच्छता करावी जे कोण मैदान वापरणार त्यांनीही जबाबदारी घ्यावी अशी मागणी धारावी नागरिक समितीचे संपर्क सचिव श्री दिलीप गाडेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे

संबंधित पोस्ट

26 तलावाच्या मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये होणार पहिला टप्पा 16 मे ते 15 जून कालावधीत…

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…

दसरा मेळावा मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठीकृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा