vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी : पैठण शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उर्वरित ४०० घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पैठण शहरातील इतर विकास कामांतर्गत पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे, आपेगाव येथील मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पूर्ण करण्यात यावीत. याचबरोबर पैठण शहरातील विविध विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

मंत्रालयात पैठण नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार विलास गुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी अंभोरे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नगर परिषदेमार्फत स्थानिक निधीतून घनकचरा व्यवस्थापन कामे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यसेवेद्वारे करण्यात यावीत. कचरा संकलन, रस्ते झाडलोट, नालेसफाई, कचरा वाहतूक तसेच मान्सून तयारीच्या अनुषंगाने शहरातील मोठे नाले जेसीबीद्वारे स्वच्छ करण्यात यावेत. घनकचरा व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, जिल्हावार्षिक योजनेंतर्गत दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स व शिवाजी बालउद्यान, ६८ व्यावसायिक गाळ्यांची कामे पूर्ण करावीत.

000000

संबंधित पोस्ट

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत  ‘श्री राजमातंगी महायज्ञ’१७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत यज्ञसोहळा चे आयोजन

विधानपरिषद प्रश्नोत्तर :एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

vishwatmaklokswamivarta

मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन