vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा- नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा- नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे

मुंबई, प्रतिनिधी : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले असून आयबीपीएस कडून दिनांक 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत. आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएस कडून पाठविण्यात येणार आहेत.

या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा इतरांकडून तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार# सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.१५ रोजी विशेष अदालतींचे आयोजन-जिल्हाधिकारी  यांचे आदेश; दि.७ ते १५ कालबद्ध कार्यक्रम

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण