vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे वापरता याव्यात यादृष्टीने ‘केवायसी’ प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकराशी संबंधित विविध सेवा आणि सुविधा आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरही मालमत्ताकर बिल पाहता येणार आहे तसेच त्याचा भरणा करता येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेशी संबंधित विविध माहिती जसे की, महत्त्वाच्या सूचना, पाणीपुरवठा, अतिवृष्टीचा इशारा, वाहतूक कोंडी या संबंधीचे इमर्जन्सी अलर्ट त्वरित मिळू शकतील.

मालमत्ताकर विभागाच्या डिजिटल सेवेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ‘केवायसी – आपले ग्राहक ओळखा’(Know Your Customer – KYC) ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन QR CODE स्कॅन करून किंवा संबंधित लिंकवर क्लिक करून KYC प्रक्रिया पूर्ण करता येईल.

          मालमत्तेला KYC जोडताना मालमत्ता धारकाचा मालमत्ता क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी तपशील भरावे लागतील. ही माहिती पूर्ण आणि अचूक भरल्यानंतर संबंधित खात्यातून SMS व Email द्वारे मालमत्ताकराची बिले, करभरणा करण्यासाठी लिंक तसेच संबंधित विभागाचे अपडेट्स मिळतील.

मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा प्रमुख स्त्रोत आहे. या महसूलातूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्ती केली जात असल्याने शहर विकासात योगदान देण्याच्या दृष्टीने नागरिकांनी वेळेत कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. सुलभ रितीने मालमत्ताकर भरणा करता यावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध ऑनलाईन माध्यमे उपलब्ध करून दिली असून त्यासाठी आवश्यक डिजिटल प्रक्रिया पार पाडणे हा आपल्या जबाबदारीचा भाग आहे.

          त्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण करून मालमत्ताकर बिले ऑनलाईन मिळवावीत आणि मालमत्ताकर वेळेत भरणा करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

आपले सरकार’ पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका…

शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे’ आयोजन;Ø महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार शुभारंभ…Ø मेळाव्यात सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन· मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta