vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू वन विभागाची माहिती 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू वन विभागाची माहिती 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

 

         राज्य प्रतिनिधी   मुंबई,: महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून 3 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 3 वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे वन विभागाने कळविले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात 6 जानेवारी रोजी एका वाघिणीचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. या वाघाच्या शिकारीत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पांढरकवडा वनविभाग अंतर्गत वणी येथे 7 जानेवारी रोजी एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून या वाघिणीचे दात, पंजे गायब असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या देवलापार वनपरिक्षेत्रात 8 जानेवारी रोजी एका बछड्याचा विजेचा धक्का देऊन मृत्यू झाला असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र वनक्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्रात 9 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. गोंदिया येथील दासगाव वनपरिक्षेत्रात दिनांक 14 जानेवारी रोजी आजारपणामुळे एका वाघाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूर येथील देवलापार वनपरिक्षेत्रात 15 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सिंदेवाही वनपरिक्षत्रात 19 जानेवारी 2025 रोजी रेल्वेला घडकून अपघात झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शिवणी वनपरिक्षेत्रातील एका बछड्याचा दिनांक 20 जानेवारी रोजी नैसर्गिक मृत्यू झाला तर 21 जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तसेच वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात 22 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला असून शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.000

संबंधित पोस्ट

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी  वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 12 जिल्हयातील 28 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न…

vishwatmaklokswamivarta

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्वीकारला पदभार-रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करणार- रोजगार हमी मंत्री भरत गोगावले

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांसाठी दोन विशेष पुरस्कारांसह १११ शिक्षकांची निवड सोमवारी पुरस्कार प्रदान कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

बारामती रेल्वे स्थानकाला आधुनिकतेची नवी ओळख!