vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारत रंग महोत्सवात तीन मराठी नाटके

भारत रंग महोत्सवात तीन मराठी नाटके

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी : रंगमंचाच्या चाहत्यांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) च्यावतीने भारत रंग महोत्सवाचे आयोजन 28 जानेवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये मराठीतील तीन नाटके सादर होणार आहेत.

जगातील सर्वांत मोठा रंगमंच महोत्सव म्हणून ओळखला जाणारा भारत रंग महोत्सव (भारंगम) यंदा २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या २५ व्या आवृत्तीत भारतासह नेपाळ, श्रीलंका आणि देशातील १३ शहरांमध्ये हा रंगोत्सव आयोजित केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व एनएसडीचे माजी विद्यार्थी राजपाल यादव यांची “रंगदूत” (महोत्सव राजदूत) म्हणून निवड करण्यात आली आहे. २० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नऊ देशांतील २००हून अधिक अनोख्या सादरीकरणांचा समावेश असेल.

८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘गोष्ट संयुक्त मानपानाची’ हे नाटक अभिराम भडकमकर लिखित व हृषीकेश जोशी दिग्दर्शित आहे. नाट्य संपदा कलामंच आणि शौर्य प्रोडक्शन्स, मुंबई या समूहांद्वारे या नाटकाची मांडणी केली जाईल.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे “कलगीतुरा” हे नाटक दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित आहे. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई या समूहाने याची निर्मिती केली आहे.

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘38 कृष्णा व्हिला’ हे नाटक श्वेता पेंडसे लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित आहे. १२० मिनिटांचे हे नाटक रॉयल थिएटर, मुंबई या समूहाद्वारे सादर होईल. तीनही नाटके मंडी हाउस जवळ असणाऱ्या श्रीराम सेंटर सभागृहात सादर केली जाणार आहेत.

0000

 

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश..

vishwatmaklokswamivarta

६ जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने …..आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व

पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीक्षेत्रीय स्तरावर भेटी देण्याचे निर्देश- मंत्री गुलाबराव पाटील

कन्या सन्मान दिवस-मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला- पालकमंत्री संजय शिरसाट

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट