vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुण्यात एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम विषयक दोन दिवसीय चिंतन शिबिराचे केले यशस्वी आयोजन; शिबिरात नवोन्मेष, डिजिटल आरोग्य आणि सहकार्यावर आधारित प्रशासनावर भर

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुण्यात एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम विषयक दोन दिवसीय चिंतन शिबिराचे केले यशस्वी आयोजन; शिबिरात नवोन्मेष, डिजिटल आरोग्य आणि सहकार्यावर आधारित प्रशासनावर भर

आरोग्य प्रतिनिधीराष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुण्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) विषयक दोन दिवसीय चिंतन शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. या शिबिरात नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सहयोगी प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य सेवा वितरण मजबूत करण्यावर विचारमंथन करण्यासाठी केंद्र तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते.

शिबिरात एनएचसीएक्स-सक्षम हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचे (एचआयएमएस) थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये आंतरकार्यक्षम आणि प्रमाणित डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून दाव्यांची प्रक्रिया सुलभ करणे, व्यवस्थेतील विखुरलेपणा कमी करणे तसेच सर्व संबंधित घटकांमध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम करण्याची क्षमता दर्शवण्यात आली.

जागतिक बँकेच्या पथकाने राज्यांना एबीडीएम राज्य अवलंबन निर्देशांकाबद्दल (ABDM State Adoption Index) माहिती दिली. हा एक प्रमाणित, डेटा-आधारित आराखडा आहे, जो मुख्य नोंदणी, अवलंबन आणि वापर, आणि अर्थसंकल्पीय वापर यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आभा (ABHA), आरोग्य सुविधा नोंदणी (एचएफआर), आरोग्य व्यावसायिक नोंदणी (एचपीआर), स्कॅन अँड शेअर आणि आरोग्य नोंदींची जोडणी यांसारख्या निर्देशकांचा मागोवा घेऊन, हा निर्देशांक कामगिरीतील उणीवा ओळखण्यास, लक्ष्यित उपाययोजना राबवण्यास आणि परस्पर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास मदत करतो. 2024-25 ची क्रमवारी लवकरच जाहीर होणार असल्याने, या शिबिरात राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडून शाश्वत डिजिटल वापराकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.चिंतन शिबिरात एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

एबी पीएम-जेएवाय अंतर्गत विविध कामगिरी निकषांवर आधारित एकूण 18 पुरस्कार प्रदान करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आणि एबीडीएम-सक्षम एचएमआयएस भागधारकांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘सिस्टम इंटिग्रेटर मॉडेल’वरील कार्यक्रमोत्तर चर्चेने या शिबिराची सांगता झाली. या सत्रात देशभरात विस्तारक्षम, प्रमाणित डिजिटल आरोग्य प्रणाली विकसित करण्याच्या मार्गांवर प्रकाश टाकण्यात आला.

***

संबंधित पोस्ट

इ संजीवनी ओपीडी’द्वारे १ लाख ७४ हजार रुग्णांना मिळाली सेवा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना..

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन, जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी सर्वांनी मिळून काम करावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

बुलढाण्यात ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा’निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ

हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान कालावधीत प्रभावी आयोजन