vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात (पीओपीएसके) पारपत्र मोबाईल व्हॅन सेवा 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत उपलब्ध

पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात (पीओपीएसके) पारपत्र मोबाईल व्हॅन सेवा 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 याउपलब्ध करून देणार आहे.

पुणे प्रतिनिधी-पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आरपीओ) 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात (पीओपीएसके) पारपत्र सेवा उपलब्ध करून देणार आहे.नागरिकांना लवकरात लवकर पारपत्रासाठी अपॉइंटमेंट उपलब्ध करून देणे तसेच पारपत्र सेवांची शेवटच्या टप्प्यातील वितरण प्रणाली सुधारणे, या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे

आवश्यक कागदपत्रे: कृपया ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अर्जदारांसाठी दिलेली चेकलिस्ट काळजीपूर्वक वाचा.[अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी पारपत्र प्राधिकरण पारपत्र कायदा 1967 च्या कलम 5 आणि पारपत्र नियम, 1980 च्या नियम 5 नुसार, सर्व प्रकारची चौकशी करू शकते आणि अर्जावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पारपत्र प्राधिकरणाला आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश अर्जदाराला दिले जाऊ शकतात.]

मोबाइल व्हॅन अपॉइंटमेंट कशी बुक करावी:पासपोर्ट इंडियाच्या (https://www.passportindia.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या आणि सर्वसाधारण योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’वर जा, ‘मोबाइल व्हॅन’ हे ठिकाण निवडा आणि अपॉइंटमेंट बुक करा.

पासपोर्ट मोबाइल सेवा केंद्र – दिनांक आणि ठिकाणाचा तपशील:दिनांक: 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026.ठिकाण: पिंपरी पोस्ट ऑफिस, हिंदुस्तान अँटिबायोटिक फॅक्टरीसमोर, जुना पुणे-मुंबई महामार्ग, खराळवाडी, पुणे – 411018वेळ: सकाळी 08:30 ते सायंकाळी 18:00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे)लावधीत उपलब्ध

संबंधित पोस्ट

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन: शेतकऱ्यांनी तयारीला लागावे

vishwatmaklokswamivarta

हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय..

vishwatmaklokswamivarta

समाज कल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट