आज*Not out 50…*स्वयम अभियान आणि W. W. F* च्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक आणि e-waste कलेक्शनचा ५० वा ड्रॉईव्ह
मुंबई प्रतिनिधी-स्वयम अभियान आणि W. W. F* च्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक आणि e-waste कलेक्शनचा ५० वा ड्रॉईव्ह दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.सी वॉर्ड मुंबई-२ येथे ९ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या
*स्वयम अभियान* या स्वच्छता मोहीम आणि जनजागृती राबवणाऱ्या संस्थेने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू केलेला ई-वेस्ट आणि प्लास्टिक वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह, सौ जान्हवी गुर्जर, सौ पूर्वा देवधर आणि प्राजक्ता रानडे यांच्या सततच्या प्रयत्नाने आता अर्ध शतकाकडे जात आहे .
या प्लास्टिक आणि ई-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह साठी सुरुवातीला जनजागृती केली. जनजागृतीमुळे लोकसहभाग वाढला.
‘सी’ वॉर्ड च्या प्रत्येक वाडीमध्ये जाऊन स्वयमच्या या नव्या उपक्रमाची विस्तारित माहिती देण्यात आली होती.
सुरुवातीला ३५ – ४० किलो प्लास्टिक जमा होत असे. आज दीडशे किलोच्या वर प्लास्टिक जमा होत आहे.
त्याचप्रमाणे ई-वेस्ट ही खूपसं जमा होतं.
या ड्राईव्हमुळे बऱ्याच लोकांना प्लास्टिक, इतस्ततः न टाकता नीट जमवून दर महिन्याला या ड्राईव्हमध्ये आणून देण्याची चांगली सवय लागली आहे.
जुने प्लास्टिक घेऊन येणारा प्रत्येक जण आपल्याबरोबर इतरांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतो.
दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत जमा केलेले प्लास्टिक आणि e-waste,
स्वयम अभियान कडून Women Welfare forum यांच्या कडे segregation साठी पाठवले जाते. त्यामुळे अनेक गरजूंना रोजगार ही मिळतो.मागील चार वर्षात पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक रहिवासी श्री.बिलीमोरिया हे त्यांच्या घरा समोरील मोकळी जागा वापरण्याची परवानगी देत आहेत. त्यांच्या या मौलिक मदतीमुळे पावसाळ्यात देखील ड्राईव्ह नियमित पार पाडतो.बीएमसी चे अधिकारी , मुकादम, कर्मचारी हे देखील अडचणीच्या वेळी मदत करतात.काही लोकप्रतिनिधी सुद्धा या उपक्रमात सहभागी होत असतात.Women welfare forum च्या पदाधिकारी कल्पना शिंदे ताई, दिलीप गाडेकर, स्मिता माने यांचेही सहकार्य फार मोलाचे आहे कारण जमा केलेला हा ड्राय वेस्ट पुढे योग्य प्रकारे हाताळण्याचे महत्त्वाचे काम ते करतात.नियमितपणे जुने प्लास्टिक आणि ई-वेस्ट घेऊन येणाऱ्या सर्व जागरूक नागरिकांच्या सहकार्याने *स्वयम अभियानचा* चा हा उपक्रम यशस्वीपणे चालू आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार.स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणे. त्याचे प्रशिक्षण देणे तसेच तयार झालेले खत विनामूल्य देणे असे अनेक पर्यावरण संबंधित
उपक्रमही स्वयम अभियान व्यवस्थितपणे राबवत आहे.असाच सर्वांचा सहभाग निरंतर लाभो म्हणजे आपण,
*एक पाऊल पुढे,*
*स्वच्छता अभियान कडे नेऊ.* “स्वयम अभियान मुंबई-२