vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत…

सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत…

 

मुंबई प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती दिनानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी तर दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला. अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा यासारख्या वाईट गोष्टींना त्यांनी विरोध केला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले. यासाठी त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांचे योगदान आणि विचार आजच्या समाजासाठी कसे मार्गदर्शक आहेत. याविषयी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व जिल्हाधिकारी रायगड यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई-  Dark Web वर कोड वापरून ड्रग्जची तस्करी करणारीआंतरराष्ट्रीय,टोळी गजाआड, 3.45 कोटींचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta