vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

गडचिरोली, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांनी आजार झाल्यास अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावर विश्वास न ठेवता तातडीने अधिकृत वैद्यकीय उपचार घ्यावेत, यासाठी व्यापक जनजागृती करून जागरूकता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भातील जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक श्री पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “अनेक नागरिक आजही आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे न जाता पुजाऱ्यांकडे जातात. हे पुजारी रुग्णांची दिशाभूल करतात. यामुळे उपचारासाठीचा महत्त्वाचा वेळ वाया जातो आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. ही सवय बदलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे.”

महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी आणि नागरिकांना योग्य उपचार घ्यायला प्रवृत्त करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घ्यावा, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक आणि ग्रामस्थांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.

, आशा वर्कर, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक व तलाठी यांनी जादूटोणासंबंधी घटनांची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना द्यावी. कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि कोरची या भागांमध्ये अशा प्रथांचे प्रमाण अधिक असल्याने यंत्रणेने विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.

यावेळी बोगस डॉक्टरांच्या वाढत्या समस्येबाबतही चर्चा झाली. कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेल्या किंवा अधिकृत वैद्य म्हणून नोंद नसलेल्या व्यक्तींनी रुग्णांवर उपचार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत, अशा व्यक्तींविरोधात पोलीस व तालुकास्तरीय समितींनी संयुक्त धाडसत्र राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, नमन गोयल, कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी व संबंधीत अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

मुंबई महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली ‘कृतज्ञतेची राखी’महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द    -पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta