vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी गावकरी, साईबाबा संस्थान, नगरपालिका यांनी समन्वयाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी गावकरी, साईबाबा संस्थान, नगरपालिका यांनी समन्वयाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

राज्य प्रतिनिधी शिर्डी, (उपमाका) श्री साईबाबा शिर्डी संस्थान येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या भाविकांच्या सुविधांसाठी वाहन पार्किंग,राहण्याची व्यवस्था, दर्शनरांग व परिक्रमा मार्ग ,स्वच्छतागृह आणि शहरात सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्री साईबाबा मंदिर संस्थानाच्या झिरो सभागृहात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांचा आढावा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला .यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नगराध्यक्षा श्रीमती जयश्री थोरात, उपनगरअध्यक्ष अभय शेळके,उपविभागीय अधिकारी माणिक आहेर. नगरपालिका मुख्याधिकारी श्री दिघे ,पोलीस उप अधीक्षक श्री अमोल भारती,यांच्यासह शिर्डी शहरातील सर्व नगरसेवक,पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.या भाविकांना उच्च दर्जाच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान, नगरपालिका , पोलीस प्रशासन,स्थानिक ग्रामस्थ यांनी पुढाकार घ्यावा. शिर्डी ही आध्यात्मिक नगरी म्हणून तयार व्हावी, यामध्ये येणाऱ्या भाविकाला स्वच्छता, निवास, वाहन पार्किंगची व्यवस्था तसेच वृद्धांसाठी वेटिंग खुर्च्या, पार्किंग ठिकाणापासून मंदिरापर्यंत मंदिर संस्थानाच्या ईव्ही शटल बस सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शहरातील नागरिकांची सुरक्षा अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच विनापरवाना एकही वाहन शहरात प्रवेशित होणार नाही याची दक्षता घ्यावी . यात ऑटो रिक्षांची तपासणी करण्याचे निर्देश बैठकीत पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

विविध शहरातून येणाऱ्या वाहनांची पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये पोलीस प्रशासनाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पार्किंग सुविधा, जागा उपलब्धतेबाबतची माहिती क्यूआर कोडद्वारे संबंधित ठिकाण याबाबत मार्गदर्शन करण्याचे सांगितले.

पालखी निवारामध्ये सुविधा उपलब्ध करून देऊन, शिर्डी शहरालगत असणाऱ्या रिंग रोडच्या माध्यमातून येणाऱ्या शहरातील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ती खबरदारी आणि नियोजन सर्व विभागाने करावे असे निर्देश संबंधित विभागाला मंत्री विखे पाटील यांनी दिले.

संबंधित पोस्ट

गोव्यात दुर्दैवी घटना- शिरगाव मंदिराच्या जत्रेत चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जखमी झाल्याची बातमी

शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

संतानी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत