vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इस्रायल आणि लेबनॉनची १० दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती

इस्रायल आणि लेबनॉनची १० दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती

 विदेश प्रतिनिधी-इस्रायल आणि लेबनॉननं १० दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली असून, दक्षिण लेबनॉनमधील सिडॉन शहरात लोकांनी जल्लोष केला.लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत समाजमाध्यम संदेशात ही माहिती दिली

लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी सध्याच्या युद्धविरामाचे रूपांतर दीर्घकालीन व कायमस्वरूपी करारांमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्रादेशिक स्थैर्यासाठी प्रयत्न करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर भागीदारांचे आभार मानले. दरम्यान

जगाच्या तेल निर्यातीकरिता अतिशय महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीमधील जहाजांच्या मार्गाला संरक्षित करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी घेतलेल्या पुढाकारामध्ये सहभागी होण्यासाठी भारतालाही निमंत्रित करण्यात आलं असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या २० टक्के तेलाच्या निर्यातीला ही सामुद्रधुनी महत्त्वाची ठरते.

त्पूर्वी, इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीचं भारतानं स्वागत केलं आहे. शांततेच्या दिशेने उचललेल्या प्रत्येक पावलाचं भारत नेहमीच स्वागत करतो, असं जयस्वाल यांनी सांगितलं

संबंधित पोस्ट

युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

🇨🇦 कॅनडाचा स्वबळावर संरक्षणाचा मोठा निर्णय: आर्क्टिक सीमांच्या सुरक्षेसाठी २६ अब्ज डॉलर्सची तरतूद!

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

भारतीय नेमबाज अनिश भानवळा यांनी काहिरो, इजिप्त येथे झालेल्या ISSF वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. 🇮🇳🏆

vishwatmaklokswamivarta

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मंगळवारी बांगलादेशातील BNP सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार.