vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पद्मभूषण अण्णा हजारे यांची विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे  भेट

पद्मभूषण अण्णा हजारे यांची विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे  भेट

अहिल्यानगर, प्रतिनिधी : राज्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

गेल्या तीन दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते राळेगण सिद्धी येथे परतले. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली

यावेळी प्रा. शिंदे यांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती घेतली. तसेच त्यांनी उपस्थित सहकाऱ्यांशीही चर्चा करून उपचारांबाबत माहिती जाणून घेतली. अण्णा हजारे यांचे समाजकार्यातील योगदान प्रेरणादायी असून त्यांनी उत्तम आरोग्य लाभून पुन्हा पूर्ववत सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी लाभेश औटी, सुरेश पठारे, रोहन मांडे, जयसिंग मापारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होहोते.0000

0

संबंधित पोस्ट

मक्काच्या गंजीला आग – शेतकर्‍याचे नुकसान- शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्या – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे

मराठी भाषा गौरव दिनी ५१ नव्या ग्रंथांचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

नीट’ परीक्षा सुरळीत…

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन,लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे निर्देश