vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संभाव्य अडचणींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घरगुती एलपीजी गॅस संदर्भातील तक्रारी व अडचणींसाठी संबंधित तालुक्यांमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क अधिकारी, पदनाम व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे :- पनवेल – श्रीम. आश्विनी धनवे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९९६७८९७४४०, उरण – महेश पाटील (नायब तहसिलदार) – ७७७५९९३११३, कर्जत – रवींद्र दळवी (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९०४९१८६२९६, खालापूर – मनोज पवार (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७४०३३९७७७७, अलिबाग – हर्षल देशमुख (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७८८९७४०६५२, मुरुड – महेंद्र गांगुर्डे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९०११९६१२३४, पेण – सतीश शिंदे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९८९०८९१८५३, रोहा – हेमलता कुरसुंगे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ८३९०६४६९८८, सुधागड (पाली) – सुखदेव वाढणकर (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ८६०५९३९६३६, माणगाव – राहुल शितोळे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ८६६८७४७९८३, तळा – नागेश शेगोकर (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९८२२२१००७६, श्रीवर्धन – रुपाली सुने (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७०२८४६९४४३, म्हसळा – चंद्रशेखर खोत (नायब तहसिलदार) – ९२२६९७१९२५, महाड – योगिता सत्यगिरी (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९२८४६३२१४४, पोलादपूर – रितेश पदलमवार (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९४०४१०२१२८.

जिल्ह्यातील नागरिकांनी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1077 वरही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घेण्याचे आवाहन केले असून, गॅस व इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta