vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

डिजीटल आर्थिक व्यवहाराबाबत जनजागृती

डिजीटल आर्थिक व्यवहाराबाबत जनजागृती

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व आपले सरकार सेवा केंद्र (CSC e Governance) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल आर्थिक व्यवहारासंदर्भात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्ह्यातील शुभारंभ  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

डिजिटल आर्थिक व्यवहार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरचे विमोचन जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभाग जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर, जिल्हा समन्वयक आपले सरकार सेवा केंद्र प्रशांत तमखाने, विशाल दिंडोरे,समाधान तुपे, आजिनाथ पवार उपस्थित होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचविण्याचे आवाहन केले. नागरिकांना आर्थिक देवाण घेवाण ही डिजीटल माध्यमाद्वारे सुरक्षित असल्याची माहिती द्यावी,असे निर्देश दिले.

 या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहार, डिजिटल आर्थिक व्यवहाराचे फायदे, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी तसेच डिजिटल साक्षरता याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियाम प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे,असे शरद दिवेकर यांनी यावेळी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

vishwatmaklokswamivarta

खते कुठे उपलब्ध?”आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहितीजिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन..

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारणासाठी पूर्वप्रमाणन करणे आवश्यक..

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग