vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

*महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

मुंबई प्रतिनिधी- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासीक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनी उद्या दिनांक 20 मार्च रोजी चवदार तळे क्रांतीदिनाला अभिवादन करणा-या जाहीर सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे येथील क्रांती स्तंभाजवळ करण्यात आले आहे. पेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथरच्या काळापासुन दरवर्षी 20 मार्च रोजी चवदार तळे क्रांतीला अभिवादन करणा-या सभेचे आयोजन केले जात आहे. यंदाही 20 मार्च रोजी सायंकाळी महाड क्रांतीभूमी क्रांती स्तंभाजवळ चवदार तळे क्रांतीला अभिवादन करणा-या सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आले असून त्या सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे..

 चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याचा सत्याग्रह नव्हता तर मानव मुक्तीचा समतेचा संगर होता. मानवीहक्काच्या आणि समतेच्या लढयात जागतिक स्तरावर चवदार तळे सत्याग्रह प्रेरणादायी क्रांती ठरलेला आहे. चवदार तळे सत्याग्रह करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या आणि मानवतेच्या चळवळीचा पाया रचला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे उभारलेल्या मानव मुक्तीच्या संगरामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. चवदारतळयाकाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मानव मुक्तीच्या संगरातुनच या देशात सामाजिक न्यायाचा उगम झालेला आहे. त्यामुळे जगभरातील समतावाद्यांसाठी चवदार तळयाची क्रांती ही प्रेरणास्थान आहे. असे सांगत ना. रामदास आठवले यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धादिनाच्या क्रांतीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 सलग तीनवेळा राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश धो.मोरे यांनी दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे

00000

 

संबंधित पोस्ट

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद कृषि विभाग स्वीय निधी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे येथे 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, 2025 चेदि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत आयोजन..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई