vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

*ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

सातारा प्रतिनिधी.- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ ताण तणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्री.ए.एस. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

सातारा येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निना. नि. बेदरकर, आंतरराष्ट्रीय योगाचे समुपदेशक तज्ञ डॉ. धनश्री पाटील, सायबर पोलीस हवालदार अतुला तावरे व वर्षा खोचे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. धनश्री पाटील यांनी दैनंदिन कामातून येणा-या ताणाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे, शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले कसे राखावे आणि शारिरीक, मानसिक आरोग्य आणि रोजचे दैनंदिन कामकाज यामध्ये समतोल कसे साधावे या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. सायबर पोलीस हवालदार अतुला तावरे आणि वर्षा खोचे यांनी ऑनलाईन फ्रॉड, डिजीटल फसवणूक, डिजीटल अरेस्ट, अशा अनेक सायबर सुरक्षेविषयी येणा-या अडचणींबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अड, सुचिता पाटील, सहाय्यक विधी सहाय्य बचाव सल्लागार यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालय, सातारा येथील कार्यरत महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता-पालकमंत्री पंकजा मुंडे • ‘रायझिंग जालना 2026’ला नागरिकांचा उस्फूर्त प्रसिसाद

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय-विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित मार्ग..

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तात्काळ शासन सेवेत समावेश करा,बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

vishwatmaklokswamivarta