vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी ट्रेनी शिक्षकांनी केली आहे. महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या योजनेची अंमलबजावणी झाली असून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक व युवतींना कार्यरत करण्यात आले असून सदरील कालावधीमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण होत नसल्याने प्रशिक्षण हे अपूर्ण राहत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची बाब विचाराधीन ठेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

व ट्रेनी (शिकाऊ) शिक्षक यांचे किमान प्रशिक्षण पूर्ण होण्याचा अनुषंगाने विचार करून आपण ट्रेनी शिक्षक यांना सदरील नियुक्ती शाळेवर किमान कार्यकाळ वाढवून मिळावे ही अपेक्षा आहे.करिता सदरील विषयाचा

गांभीर्यपूर्वक विचार करून ट्रेनी शिक्षक यांना नियुक्ती शाळेवर शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने किमान कार्यकाळ वाढवून देण्यात यावा ही एकमेव मुख्य मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर जातीने लक्ष केंद्रीत करून

न्यायाची भूमिका घेत कार्यकाळ वाढवून देण्याची जलद गतीने कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षनार्थी छत्रपती संभाजी नगर तालुका अध्यक्ष मा.श्री. विजय राठोड सर, वैशाली चव्हाण मॅडम, पूजा राठोड मॅडम, माधुरी इंगळे मॅडम, कविता घुगे मॅडम, मनीषा मदन मॅडम, विष्णू लघुटे सर, दिनेश ठोंबरे सर, भरत गाडेकर सर, नारायण तांबे सर, वंदना मॅडम, तुषार पवार सर, बिबीशन चव्हाण सर, भगवान पठाडे सर, प्रियंका मनगटे मॅडम, शुजाता शेंगडे मॅडम, शेख इम्रान सर, गणेश आहेर सर, जेव्हेरिया मॅडम शहेनाज पठाण हिना शेख सिमा पटेल इत्यादी युवा प्रशिक्षनार्थी उपलब्ध होते.

संबंधित पोस्ट

नागपूर-अत्याधुनिक सुविधायुक्त ‘गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गितांवर सामुहिक कवायत कार्यक्रम;जिल्ह्यातून सव्वा लाख विद्यार्थी सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..