vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश…

 

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर, जळगांव जामोद तालुक्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे केळी, संत्रा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक घरावरचे टिनपत्रेही उडून गेली आहेत या वादळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानींचे तात्काळ पंचनामा करण्याच्या निर्देश केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत…

 बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर आणि जळगांव जामोद या तालुक्यामध्ये 1 जुनच्या सांयकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, सावळा, अकोली, चांगेफळ, निवाना, रुधाना, वकाना, पळशी झाशी, बावनबीर, टुनकी, काकनवाडा, वरवंड यासह अन्य गावामध्ये शेतातील केळीचे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात सुमारे 6 हजार हेक्टर शेतजमीनीवरील केळी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केळी बागायतदार शेतकऱ्यांचे या वादळी पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जळगांव जामोद तालुक्यातही या वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून सुमारे 450 हेक्टर शेतजमीनीवरील केळींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी संत्रा पिकांचेही नुकसान झाले आहेत तर अनेक शेतकऱ्यांचे घरावरचे व गोठयावरचे टिनपत्रे उडून गेल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुंटूब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांना दिले आहेत.

000000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ; वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा- सभापती प्रा.राम शिंदे• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणिविद्यापीठ इमारत १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या बैठकीत सूचना..

पोक्सो व बाल विवाह कायद्याची अंमलबजावणी करा- ॲड संजय सेंगर

vishwatmaklokswamivarta

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपीदुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta