vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय..

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय..

राज्य प्रतिनिधी -रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी तयारी केली आहे. दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांना पाचशे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे सणाच्या काळात रेल्वे प्रवासातील गर्दी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सिकंदराबाद स्थानकावर विशेष “होल्डींग क्षेत्र” उभारण्यात आले आहे. या ठिकाणी गर्दीच्या वेळी प्रवाशांना थांबण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही व्यवस्था नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील योजना आखण्यात येईल.

रेल्वेने या कालावधीत विशेष गाड्या, वाढीव डबे, अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा यांची तयारी केली आहे. स्टेशन परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि नियंत्रण कक्ष यांसारख्या सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, तिकीट आगाऊ आरक्षित करून प्रवासाचे नियोजन करावे आणि गर्दीच्या काळात संयम पाळावा.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्वासन…

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…

vishwatmaklokswamivarta

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार