vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू,मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित    सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू,मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित    सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राजकुमार बडोले, धर्मरावबाबा आत्राम, नाना पटोले यांनी प्रश्न उत्तरेच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.राज्यात ‘कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षण दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील कुमारी खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अ‍ॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे. आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली.

vishwatmaklokswamivarta

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

इयत्ता १० वी, १२ वी पुरवणी परीक्षा;५८१९ विद्यार्थ्यांसाठी २४ केंद्रांवर सज्जता

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनाचे व द्राक्ष परिसंवादाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी; प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना