vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

 

 सांगली, प्रतिनिधी : बदलत्या हवामानात शेतीला शाश्वत बनवण्यासाठी, तसेच पाणी आणि माती व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (PoCRA) आणि ‘पाणी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका ‘विशेष डिजिटल शेती शाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभाग आणि संयोजकांतर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे

सध्याच्या काळात लहरी हवामान, अपुरा पाऊस आणि पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे शेतीसमोर अनेक संकटे उभी आहेत. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ही डिजिटल शेती शाळा सुरू करण्यात आली असून, शेतकरी आता घरबसल्या आपल्या मोबाईलवर शेतीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत.

 या डिजिटल शेती शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि विषय – नियोजित दिनांकादिवशी सायं. ७.३० वाजता. दिनांकः १ एप्रिल, २०२६ – भाग १ पेरणीपूर्वचे तंत्रज्ञानः बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया. दिनांक ८ एप्रिल, २०२६ – भाग २ निविष्ठा उत्पादन बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन. दिनांक १५ एप्रिल, २०२६ – भाग ३ एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. दिनांक २२ एप्रिल, २०२६ – भाग-४ भात शेतीचे लागवड तंत्रः भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत.

सहभाग कसा घ्यावाही शेती शाळा ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची (ऑनलाइन) आहे. या शेती शाळेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी लिंक (Zoom/Google Meet किंवा YouTube link), तारीख आणि वेळ गावातील उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी, कृषिताई, कृषिसखी कृषि मित्र, सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे उपलब्ध करून दिली जाईल.

पाण्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक शेतीची कास धरणे ही काळाची गरज बनली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनचे जलसंधारणाचे मॉडेल आणि पोकरा प्रकल्पाचे कृषी तंत्रज्ञान यांचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी, विशेषतः युवा आणि महिला शेतकऱ्यांनी या डिजिटल शेती शाळेत आवर्जून सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात “सुरक्षित इंटरनेट दिन २०२६” उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा