
राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारणासाठी पूर्वप्रमाणन करणे आवश्यक..
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रचार, प्रसिध्दीकरीता राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून विविध माध्यमांचा वापर करण्यात येईल. यामध्ये आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे व मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार, प्रसार व्हावा या करिता आयोगाच्या दि. 09 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणूकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम सनियंत्रण व जाहीरात प्रमाणन आदेश 2025’ या अधिसूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे.
या अनुषंगाने सदर अधिसूचनेनुसार महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) श्रीम.रश्मी नांदेडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी श्री. सत्यवान उबाळे हे समिती सदस्य आहेत.
निवडणूकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षास अथवा उमेदवारास दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्युब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी एफ.एम.वाहिन्या, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणचे ऑडिओ – व्हिज्युअल डिस्प्ले, ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे अशा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे जाहीरात प्रसारित / प्रसिध्द करावयाची असल्यास त्या प्रस्तावित जाहिरातींचे समितीकडून ‘पूर्वप्रमाणन’ म्हणजे ‘प्रसिध्दी अथवा प्रसारणापूर्वी मान्यता घेणे’ आवश्यक आहे. पूर्वप्रमाणन केले नसल्यास त्या जाहिरातीचे प्रसारण / प्रसिध्दी करता येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. जाहिरात पूर्वप्रमाणनासाठी जाहिरात प्रसारित / प्रसिध्द करावयाच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान 5 दिवस आधी समितीकडे ‘परिशिष्ट – 4’ नुसार अर्ज करावयाचा आहे.
सदर अर्ज नमुना प्रत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात तिस-या मजल्यावर माहिती व जनसंपर्क विभागातील माध्यम निरीक्षण कक्षामध्ये उपलब्ध होईल व ते अर्ज त्याच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह जमा करावयाचे आहेत.
अर्जासोबत प्रसारित करावयाच्या जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रती या 2 पेन ड्राईव्हमध्ये, राजकीय पक्षाच्या पदाधिका-याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या 2 मुद्रित प्रतींसह (प्रिंट्स) जमा करावयाच्या आहेत.
निवडणूकविषयक जाहिरातींवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या; तर उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश उमेदवाराच्या निवडणूक खर्चात करणे आवश्यकक आहे.
खालील स्वरूपाच्या आशयाचा समावेश असलेल्या जाहिराती प्रसारित / प्रसिद्ध करता येणार नाहीत व अशा स्वरुपाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणनही केले जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावयाची आहे. यामध्ये –



