vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नमस्कार नांदेडकर…मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड. 

नमस्कार नांदेडकर…मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड.

 राज्य प्रतिनिधी-आपल्या नांदेड शहरात खरच पेट्रोल चा तुटवडा आहे का ? तर मित्रानो असे काहीही नाही. जर तुम्हाला असा मेसेज कुणी पाठवले असतील तर त्या निव्वळ अफवा आहेत.

मग पेट्रोल पंप बंद का होत आहेत ?

पंप बंद होण्याचे कारण म्हणजे जो व्यक्ती नियमित मर्यादित पैशांचे पेट्रोल डिझेल खरेदी करतो तो व्यक्ती टँक फुल करून घेतोय. यालाच पॅनिक पर्चेस म्हणतात. यामुळे पंपावर गर्दी होत आहे जी सांभाळण्यासाठी पंपावर पुरेशी यंत्रणा नाही. पोलिस फक्त संरक्षण करू शकतात पण पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मर्यादा आहेत. पॅनिक पर्चेस मुळे टँकर येईपर्यंत स्टॉक संपतो.

इंधन पुरवठा नियमात बदल,पेट्रोल पंपाना पेट्रोल/डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आता अँडव्हान्स पेमेंट सिस्टिम सुरू केली आहे यामुळे टँकर येण्यासाठी थोडा वेळ लागतोय पूर्वी पेट्रोल/डिझेल टँकर मागवल्यावर 4 दिवसांत पेमेंट केले जायचे सध्या यात बदल झाले आहेत परिणामी टँकर अँडव्हान्स पेमेंट नंतर भरून निघतो.सध्या जिल्ह्यात पेट्रोल/डिझेल उपलब्ध आहे का

तर मित्रानो नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल/डिझेल उपलब्ध आहे. फक्त पंपावर ग्राहकांनी पॅनिक खरेदी बंद केली आणि अनावश्यक गर्दी कमी केली तर संपूर्ण जिल्ह्याला अडचण येणार नाही.म्हणून मित्रानो अशा परिस्थितीत आपण आपल्याला साथ देऊया अफवांवर अविश्वास दाखवूया.

 

धन्यवाद…

संबंधित पोस्ट

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींच्यापायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन

प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई