vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अलिबाग जिल्हा न्यायालयातील लोकअभिरक्षक सेवेचा जनसामान्यांना आधार-आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या अशीलांना मोफत कायदेशीर मदत, विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम.

अलिबाग जिल्हा न्यायालयातील लोकअभिरक्षक सेवेचा जनसामान्यांना आधार-आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या अशीलांना मोफत कायदेशीर मदत, विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम.

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- तुरूंगातील कैदी, महिला, मुले, अनुसूचित जाती-जमातीचे नागरिक, 60 वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आपत्तीग्रस्त व ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 3 लाख व त्यापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून लाभ दिला जातो. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे न्यायालयीन सुनावणीकरीता वकिलांचे शुल्क भरू न शकणाऱ्या अशीलांसाठी 3 वर्षापूर्वी लोकअभिरक्षक कार्यालय, अलिबाग जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आले असून मार्च महिन्यामध्ये त्याला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. याकालावधीत या कार्यालयाने अनेक न्यायालयीन बंदी, आर्थिक परिस्थिती नसलेल्या आरोपींना मोफत खटले चालवण्याकरीता वकिल देवून कायदेशीर मदत केलेली आहे.

लिगल एड क्लिनिक- तुरूंगामध्ये लिगल एड क्लिनिक द्वारे कैद्यांना कायदेशीर पर्यायांची माहिती दिली जाते. दर आठवडयात 2 वेळा तुरूंगात भेट देवून हे काम केले जाते.

कामाची विभागाणी-मुख्य व उपमुख्य लोकअभिरक्षक हे सत्र न्यायालयातील प्रकरणे हाताळतात. तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील कामकाज सहाय्यक अभिरक्षक हे पाहतात.

कोणती प्रकरणे हाताळली जातात- न्यायाधीशांनी सूचविलेली प्रकरणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पाठविलेली प्रकरणे, तुरूंगातील बंदी आरोपी यांच्याकडून आलेले अर्ज

अलिबागमध्ये असे आहे कार्यबळ- मुख्य लोकअभिरक्षक- 1, उपमुख्य लोकअभिरक्षक- 1, सहाय्यक लोकअभिरक्षक- 4

या योजनेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून कायदेशीर सहाय्य मागण्यासाठी येणाऱ्या अर्जात सातत्याने वाढ होत असल्याचे लोकअभिरक्षक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”

शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम दि.१० पासून

vishwatmaklokswamivarta

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून खरोळा येथील पिंपळे परिवाराचे सांत्वन

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार..

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव

डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद