vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट

नागपूर, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते.

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस टेम्पल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपुरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट द्यायची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

संबंधित पोस्ट

फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये शाळेचे हस्तकला प्रदर्शन : पालकांनी दिली दाद…

vishwatmaklokswamivarta

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

vishwatmaklokswamivarta