vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रत्नागिरीत आरे-वारे समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या

रत्नागिरीत आरे-वारे समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या…

 

राज्य प्रतिनिधी -रत्नागिरीत आरे-वारे समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या तर पंढरपुरा चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल असून बचाव कार्य करत आहेत

रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात 4 जण बुडाले, चारही जणांचा मृत्यूपर्यटक बुडाल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळताच रत्नागिरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये देव दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी:पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील आरेवारे समुद्रावर पोहण्यासाठी गेलेले रत्नागिरीतील 4 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये 4 जण ठार झाले असून त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यात 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जुनेद बशीर काझी, ( 30, ओसवाल नगर, रत्नागिरी), जैनब जुनेद काझी, ( 28, ओसवाल नगर, रत्नागिरी), उजमा समसुद्दीन शेख (वय 17, मुळ मुंबई मुंब्रा, सध्या ओसवाल नगर, रत्नागिरी), ऊमेरा समसुद्दीन शेख (वय 16, मुळ मुंबई मुंब्रा, सध्या ओसवाल नगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या 4 जणांची नावे आहेत.

पर्यटक बुडाल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळताच रत्नागिरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथील कुटुंब आरे वारे येथील समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना 3 महिला समुद्राच्या पाण्यात ओढल्या गेल्या.

दरम्यान येथील महिलांनी  आरडा ओरडा करताच त्यांच्यातील एका पुरुषाने त्यांना वाचण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांना वाचवताना तोही बुडाला. पोलिस घटनास्थळी दाखल होताच स्थानिक आणि काही तरुणांनी 4 जणांना बाहेर काढले. यातील 4 जण मृत झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना, सुरुवातीला बुडालेल्या चार जणांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागले. नंतर एकाचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित पोस्ट

मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुक्कामी दौरा महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकालीअवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश

नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट: *नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta