vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

जालना, प्रतिनिधी :- राज्यात अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच तयार करुन शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहिम स्वरुपात दि. 16 डिसेंबर, 2024 रोजीपासून राबविण्यात येत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीमंत हारकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शासनाकडून अॅग्रीस्टॅक अॅप विकसित करण्यात आले असून त्या माध्यमातून शेतकरी स्वतः अथवा आपले सेवा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांच्या माध्यमातून सदर योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्र सर्व लाभार्थींना समाविष्ट करुन घेणे, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करुन घेण्यात सुलभता, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होवू शकेल. शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभता येईल. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल. शेतक-यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार, प्रचारात सफलता प्राप्त होईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ; वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा- सभापती प्रा.राम शिंदे• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणिविद्यापीठ इमारत १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या बैठकीत सूचना..

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई- नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*