vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट: *नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट:*नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

 

गडचिरोली, प्रतिनिधी: भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ जुलैकरिता ऑरेंज अलर्ट आणि २५ जुलैकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसेच २५ जुलै रोजी अत्याधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २४ जुलै रोजी जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यासह, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठीही पुढील २४ तासांसाठी येलो/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:

*नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:*पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अतिवृष्टीच्या काळात नदी, तलाव, बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ जाणे टाळावे.पर्यटकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी आणि सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.नदी/नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये.

आपत्कालीन संपर्क क्रमांक:*आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी दूरध्वनी: ०७१३२-२२२०३१ / ०७१३२-२२२०३५ किंवा मोबाइल: ९४२३९११०७७ / ८२७५३७०२०८ / ८२७५३७०५०८ यावर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये आज चौथं शाही स्नान संपन्न

vishwatmaklokswamivarta

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारीजिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभभारत विकासाच्या अमर्याद संधींचा – उपराष्ट्रपती जगदीप धनखडप्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा-राज्यपाल राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन