vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये आज चौथं शाही स्नान संपन्न

प्रयागराज मध्ये महा कुंभमेळ्याचे आज चौथे शाही स्नान संपन्न

 

राज्य प्रतिनिधी – उत्तर प्रदेशच्या पावन धरतीवर सुरू असलेला महा कुंभमेळा,प्रयागराज  मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये आज  चौथं शाही स्नान संपन्न झालं आहे. वसंत पंचमी  चा मुहूर्त साधत हे शाही स्नान संपन्न झालं आहे. आजही भाविक मोठ्या संख्येने अमृत स्नानामध्ये सहभागी होण्यासाठी त्रिवेणी संगमावर जमले आहेत. देशा-परदेशातील भाविकांनी यामध्ये सहभागी होत शाही स्नानाचा आनंद घेतला आहे. वसंत पंचमी च्या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी धारणा आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या शाही स्नानामध्ये मोठ्या संख्येने भाविक त्रिवेणी संगमावर आल्याने 30 जणांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला. आज शाही स्नानादरम्यान गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजेपर्यंत 62.25 लाख भाविकांनी अमृत स्नान केले. 2 फेब्रुवारीपर्यंत 34.97 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. त्रिवेणी संगमावर अमृतस्नाना दरम्यान गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

संबंधित पोस्ट

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर..कार्याध्यक्ष गणेश सोळंकी तर सचिव पदी गणेश सवडतकर यांची नियुक्ती..

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणीमतदार पडताळणीसाठी 11 ते 14 एप्रिलपर्यंत विशेष कॅम्प