vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

 

जालना । प्रतिनिधी – गेली पाच-सहा वर्षांपासून पत्रकार व वृत्तपत्रांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने दर दोन वर्षांनी वृत्तपत्रांना महागाई निर्देेशांकाची सांगड घालून दरवाढ करणे अपेक्षित असतांना गेल्या सहा वर्षांमध्ये एकदाही दरवाढ करण्यात आली नाही, मागील अडीच वर्षांपासून राज्यभरातील वृत्तपत्रांची पडताळणी रखडलेली असून ही पडताळणी तात्काळ करण्यात यावी. सहाय्यक संचालक आणि उपसंचालक पदांसाठीची एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना रविवार (दि 26) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल स्वागत करण्यात आले.

दरम्यान पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लागलीच स्वीय सहाय्यकांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्याच्या सुचना दिल्याने वृत्तपत्र व पत्रकारांचे प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, सुहास वैद्य, नरेंद्र जोगड यांची उपस्थिती होती. मागण्यांचा सकारात्मक विचार करून येत्या 20 फेबु्रवारी 2025 पर्यंत मागण्या मान्य करण्यात याव्यात व न्याय द्यावा. अन्थया लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

मागण्या पुढील प्रमाणे-शासनमान्य यादीत सामाविष्ट असलेल्या लघु संवर्गातील साप्ताहिकांवर शासनाकडून प्रसिद्धीस देण्यात येणार्‍या दर्शनी व वर्गिकृत जाहिरात वितरण प्रणालीत प्रत्येकवेळी भेदभाव केल्या जात आहे. प्रसिद्धीस देण्यात येणार्‍या जाहिराती ह्या मोठे, मध्यम संवर्गासह लघु संवर्गातील दैनिकांना दिल्या जातात. मात्र, लघु संवर्गातील साप्ताहिकांना टाळल्या जात आहे., शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.6.6 या मुद्द्यात बदल करून सर्व संवर्गातील दैनिक-साप्ताहिक वृत्तपत्रांना समान न्यायाने सरसकट जाहिराती देण्यात याव्यात. तसेच मागील वर्षभरात शासनमान्य यादीवरील लघु संवर्गातील साप्ताहिकांचा अनुषेश भरुन द्यावा.

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.5.9 या मुद्यानुसार शासनमान्य यादीत सामाविष्ट असलेल्या लघु संवर्गातील साप्ताहिकांना रंगीत जाहिराती, पहिले पान, विशेष पान, नाविन्यपूर्ण जाहिराती देण्यात याव्यात.

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.5.10 यानुसार दर दोन वर्षांनी दरवाढ करण्याचे आदेश आहेत. 4.5.2 मध्ये नमुद कोष्टकातील दराची महागाई निर्देशांकाशी सांगड घालून नवे वाढीव दर देण्यात यावे. ( कारण- गेल्या सहा वर्षांपासून एकदाही दरवाढ करण्यात आली नाही.)

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.6.1 नुसार शासनाच्या अधिनस्त मंडळ-महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्य संस्था आदींना लघु संवर्गातील साप्ताहिकांना जाहिरात देण्याचे बंधनकारक करावे.शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.6.2 मध्ये बदल करण्यात यावा. यात वृत्तपत्रात निविदेसंदर्भात संक्षिप्त स्वरूपात जाहिरात प्रसिद्धीस देण्याची नोंद आहे. ती हटविण्यात येऊन संकेतस्थळावरील विस्तृत स्वरुपात प्रसिद्ध होणारी निविदा ही संपूर्णपणे वृत्तपत्रांना प्रसिद्धीस देण्यात यावी. आणि यातही लघु संवर्गातील साप्ताहिकांनाही अशी संपूर्ण निविदा प्रसिद्धीची जाहिरात देण्यात यावी.

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.6.5 मध्ये बदल करून भुसंपादनाच्या जाहिराती ह्या लघु संवर्गातील साप्ताहिकांना प्रसिद्धीस देण्यात याव्यात. तसेच विभागीय माहिती उपसंचालकांकडून देण्यात येणार्‍या जाहिरातीत लघु संवर्गातील साप्ताहिकास किमान एक जाहिरात देण्यात यावी

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.6.7 मध्ये मान्यताप्राप्त यादीतील सर्व वृत्तपत्रांना एका आर्थिक वर्षात 9 व एक ऐच्छिक जाहिरात देण्यात येत आहे. यात सुधारणा करण्यात यावी. व एका आर्थिक वर्षात किमान 20 जाहिराती देण्यात याव्यात.

यात प्रामुख्याने महात्मा गांधी जयंती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, भगवान महावीर जयंती, नाताळ (25 डिसेंबर) रमजान ईद, रामनवमी, विजयादशमी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर जयंती, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती, महिलांच्या सन्मानार्थ महिला दिन अथवा मकर संक्रांत, महाराणा प्रताप जयंती, पंढरपूर यात्रानिमित्त व वृत्तपत्रांच्या वर्धापन दिन यातील जाहिरातीचा समावेश त्यात करण्यात यावा.

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.6.8 नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी व शासनमान्य यादीत सामाविष्ट नसलेल्या वृत्तपत्रांना या नियमानुसार जाहिरात देण्यात यावी.

शासकीय संदेश प्रसार नियमावली -2018 मधील 4.12 नुसार वेब आणि समाजमाध्यमांना जाहिराती देण्यासंबंधी नियमावली निश्‍चित करण्यात यावी. यात प्रामुख्याने शासनमान्य जाहिरात यादीत सामाविष्ट असलेल्या सर्वच संवर्गातील वृत्तपत्रांच्या वेब (ब्लॉगर/वर्डप्रेस), युट्युब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सर्व प्रकारच्या समाज माध्यमांना विनाअट जाहिराती देण्यात याव्यात.

एका आर्थिक वर्षात देण्यात येणार्‍या जाहिराती ह्या 400 चौसेमी आकाराच्या देण्यात येतात. या आकारात सरसकट वाढ करण्यात येऊन किमान 1000 चौसेमी आकाराच्या जाहिराती देण्यात याव्यात.

साप्ताहिकांना देण्यात येणार्‍या अधिस्विकृती पत्रिकेत वाढ करण्यात येऊन एका साप्ताहिकांच्या किमान 5 व्यक्तींना अधिस्विकृती पत्रिका देण्यात यावी

ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणार्‍या अधिस्विकृती पत्रिका व पेन्शन संदर्भातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.शासनमान्य जाहिरात यादीत सामाविष्ट वृत्तपत्रांना देण्यात येणार्‍या जाहिरातीचे बील हे जाहिरात प्रसिद्धी नंतर किमान 30 दिवसांमध्ये अदा करण्यासंबंधी संबंधीत विभागांना आदेशित करावे. तसेच वृत्तपत्रांची मागील थकीत बीले ही तात्काळ अदा करण्यात यावी.

00000p00

संबंधित पोस्ट

विश्वकोश मंडळातर्फे आज (दि.५) भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, ड्रोन व हवाई उपकरणांवर बंदी…

विधानसभा प्रश्नोत्तर :आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा* *4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली*