vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग…

बारामती, प्रतिनिधी बारामती पॉवर मॅरेथॉन हा केवळ एक क्रीडा उपक्रम नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.

मंत्री पाटील यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित बारामती पॉवर मॅरेथॉनला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी खासगी सचिव विकास ढाकणे, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील मुसळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजक सतीश ननावरे आदी उपस्थित होते.मंत्री पाटील यांनी मरेथॉनचे आयोजक आणि सहभागी धावपटूंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.

पाटील म्हणाले, बारामतीने क्रीडाक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे आणि अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला नवचैतन्य मिळते, या निमित्ताने बारामतीमध्ये उत्साह, जोश आणि ऊर्जेचा संगम अनुभवायला मिळालामुख्य स्पर्धेत ४२.२ किमी फुल मॅरेथॉन, २१.१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी रन आणि ५ किमी फन रन अशा चार गटांमध्ये स्पर्धा पार पडली. बारामती पॉवर मॅरेथॉन सिझन-३ मध्ये ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग घेतला; विभागनिहाय मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.

४२.२ किमी-महिला गट-

१.आरती – वय गट: ४० ते ४९ वर्षे महिला – वेळ: ०३:५०:३७

२.राजनी सिंग – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०३:५१:३७

३. सिंधू उमेश – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०३:५४:५५

४२.२ किमी-पुरुष गट

१.बबलू पाटिंग चव्हाण – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ०२:४२:२

२. प्रदीप केरकेट्टा – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०२:५०:१६

३. योगेश सानप – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०३:०१:००

२१.१ किमी-महिला गट

१. प्रियांका दादाजी देोरे – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ०१:३५:२०

२. अभिलाषा मोडेकर – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०१:४२:३०

३. सौम्या पिल्लई – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०१:४६:५६

२१.१ किमी-पुरुष गट

१. विशाल विष्णू कंबिरे – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:११:१६

२. लेट चांगदेव हिरामन – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:११:५२

३. सुजल सोमनाथ सावत – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:२०:२

१० किमी-महिला ग

१. सुरेखा रामा माताणे – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:४१:५

२. रोशनी भूषण निशाद – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:४४:१४

३. काजल भालचंद्र यादव – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:५१:३३

१० किमी-पुरुष गट

१. देशराज मीणा – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३५:०५

२. कुनाल जाधव – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३६:३३३. गौरव पवार – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३७:०८

स्पर्धेतील ठळक बाबी

■ नागपूर येथील सात वर्षांची कुमारी आर्या पंकज टाकोणे हिने ५ किमी धाव २५ मिनिटांत पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला.

■ उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव डॉ. अमर भडंगे, क्रीडा मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील आगरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. समारोपाप्रसंगी विजेत्या धावपटूला पारितोषिक वितरण करण्यात आले.

 

०००

संबंधित पोस्ट

आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta