vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासाठी नियोजन- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासाठी नियोजन- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी: ठाणे शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी नियोजन केले आहे. ठाणे शहराला 1230 MLD (मिलियन लिटर प्रति दिवस) पाण्याची गरज भासेल, याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले

ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासंदर्भात सदस्य अॅड निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ बोलत होत्या.नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या,ठाणे शहरासाठी स्वतंत्र जलसाठा निर्माण करण्याच्या उद्देशाने काळू धरण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एम एम आर डी ए मार्फत 350 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे शहराला अधिक प्रमाणात पाणी मिळू शकणार आहे.

ठाणे महापालिकेने पाणीपुरवठा वाढवण्यासाठी विविध स्तरांवर नियोजन केले असून, मिरा-भाईंदर, मुंबई महानगरपालिका, तसेच एम. आय. डी. सी. कडून वाढीव कोटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, नवीन धरण प्रकल्पाद्वारे शहराला दीर्घकालीन उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.ठाणेकरांना भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी नियोजन आणि निर्णय प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असे श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

00000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

वनवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा*- *वनमंत्री गणेश नाईक*

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

vishwatmaklokswamivarta