vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-

आयकर विवरणपत्रांमध्ये दि.१ एप्रिल २०२५ पासून, आर्थिक वर्षांच्या सहा वर्षांनंतर कोणत्याही सुधारणा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळ२००७-०८ते २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील कर विवरणपत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी दि.३१ मार्च पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक करदात्यांनी त्यांच्या कर विवरणपत्रांमध्ये काही त्रुटी ठेवल्या आहेत. या त्रुटींमुळे आयकर विभागाच्या TRACES पोर्टलवर थकबाकीची मागणी दिसत आहे.या समस्येवर उपाय म्हणून, करदात्यांनी TRACES पोर्टलवर सुधारणा विधाने दाखल करून त्यांच्या थकबाकीची मागणी शून्य करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या करदात्यांच्या कर विवरणपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यांनी दि.३१ मार्च पूर्वी आवश्यक ती सुधारणा करावी,असे आवाहन सहाय्यक संचालक निवृत्तीवेतन विभागाच्या श्रीमती सुषमा बुरकुले यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान

जालन्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींचे पोलिसांना निवेदन..

बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.-उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई  अजित पवार

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

vishwatmaklokswamivarta