vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालन्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींचे पोलिसांना निवेदन..

जालन्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींचे पोलिसांना निवेदन..

जालना (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली होती. यावरुन प्रशांत कोरटकरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (2023) 152, 196,197,299, 302,351(2) आणि 352 अन्वये कदीम जालना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नागपूर येथील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल व इन्स्टाग्रामवरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. समाज माध्यमावरुन इंद्रजीत सावंत यांनी याची माहिती दिल्यानंतर आमच्या भावनेला ठेच पोहचली असून, असा व्यक्ती समाजासाठी धोकादायक ठरु शकतो. प्रशांत कोरटकर याने मराठा समाजाला व महापुरुषांना शिवीगाळ करून सामाजिक, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. त्याचा सिडीआर पोलिस तपासणीतून तो कॉल त्याच्याच मोबाईलमधून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कॉल/व्हिडिओ रेकॉर्डिंग/वृत्तांत त्याने त्याच्या मित्र गटात प्रसारीत केले आहे आणि तसा केला असल्याबद्दल इंद्रजित सावंत यांनी स्वतःची खातरजमा केली आहे.

तरी राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर याच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच यात आणखी कोण सहभागी आहेत याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानंतर प्रशांत कोरटकरविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनावर डॉ. संजय लाखे पाटील, अरविंद देशमुख, विष्णू पाचफुले, अशोक पडूळ, भरत मानकर, संभाजी देशमुख, राजेंद्र गोरे, काकासाहेब खरात, मंगेश चव्हाण, सुभाष कोळकर, ज्ञानेश्वर कदम, शरद देशमुख, यु. डी. देशमुख, गणेश उबाळे, लक्ष्मण गाडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित पोस्ट

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद 6 हजार 542 प्रकरणे निकाली…