vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन

जालना, प्रतिनिधी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर केला आहे. परंतू ज्या विद्यार्थ्याना सेंट बँक ऑप्‍शन आले आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्रुटीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावयाचे आहेत. तसेच विद्यार्थ्यानी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब त्यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी बँक तपशील भरुन घेण्याची व त्रुटीची पुर्तता तात्काळ करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी अकरावी, बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्याना त्रुटी असतील तर विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या काही त्रुटी असतील तर त्रुटीची अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वैयक्तिक लॉगीनला सेंट बॅक ऑप्शन देण्यात आलेले आहे. असेही कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव• मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन…

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी अज्ञात चोरट्याकडून चाकू हल्ला-लीलावती रुग्णालयात दाखल, पोलीस आरोपी चा शोध घेत आहे

vishwatmaklokswamivarta

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…