vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५ चा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५ चा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

राज्य प्रतिनिधी-संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५ चा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय सदर समितीने केला आहे

संत श्री नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या २४ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता हा पुरस्कार सोहळा श्री केशवराज मंदिर, संत नामदेव महाराज वाडा, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” मला देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे. माझ्यासारख्या पांडुरंग भक्तासाठी ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. काल संत नामदेव महाराजांच्या तीन पिढ्यांतील वंशजांनी माझ्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन मला या पुरस्कार सोहळ्यासाठी निमंत्रित केले.

संत श्री नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या २४ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता हा पुरस्कार सोहळा श्री केशवराज मंदिर, संत नामदेव महाराज वाडा, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.

वारकरी संप्रदायाचे सक्षमीकरण, कीर्तनकारांचा गौरव, दिंड्यांना शासनमान्यता, आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या माझ्या हातून घडलेल्या सेवेबद्दल त्यांनी मला हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला या पुरस्कारास पात्र समजले, हा मी माझा बहुमान समजतो. तसेच या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल यावेळी श्री संत नामदेव महाराज देवस्थानचे मनापासून आभार मानले. तसेच या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनम्रपणे मान्यता दिली.

यावेळी या संत श्रीनामदेव महाराजांचे १६ वे वंशज श्री.मुकुंदमहाराज नामदास, संत श्रीनामदेव महाराजांचे १७ वे वंशज श्री.एकनाथमहाराज नामदास, श्री.निवृत्तीमहाराज नामदास, श्री.मुरारीमहाराज नामदास, संत श्रीनामदेव महाराजांचे १८ वे वंशज भावार्थमहाराज नामदास, आदित्यमहाराज नामदास पद्मनाभमहाराज नामदास व नामदेवमहाराज फड परिवार सदस्य उपस्थित होते. श्री संत नामदेव महाराज फड परंपरा इतर सदस्य तसेच धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-बचतगटांच्या उत्पादनांना मागणी

नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यात होणार 8 चार्जींग स्टेशन कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

विशेष लेख-:तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची ज्येष्ठ नागरिकांची इच्छाशासन करणार पूर्ण“मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना”

vishwatmaklokswamivarta

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव