vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

 

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) दि. 11 फेब्रुवारी 2025 ते दि. 18 मार्च 2025 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) दि. 21 फेब्रुवारी 2025 ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एकूण 51 केंद्रांवर तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एकूण 103 परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

   परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.    हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागून राहणार नाही, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.00000

संबंधित पोस्ट

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार# सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार;13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा ‘फितुरांना’ निर्वाणीचा इशारा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन