vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बुलढाण्यात कॅन्सर व्हॅन जनजागृती व मोफत तपासणी मोहिमेचा शुभारंभ

बुलढाण्यात कॅन्सर व्हॅन जनजागृती व मोफत तपासणी मोहिमेचा शुभारंभ

 

बुलढाणा,द प्रतिनिधी : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (NCD) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष मोहिमेला प्रारंभ झाला.

या मोहिमेअंतर्गत विशेष कॅन्सर तपासणी व्हॅन १५ जून ते १५ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात भ्रमण करून नागरिकांची मोफत तपासणी करणार आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग यांचे लवकर निदान करण्यासाठी विविध ठिकाणी विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजीत मंडाले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा चव्हाण, दंतशल्यचिकित्सक डॉ. विष्णु सोळंकी, डॉ. सय्यद अरशद, डॉ. अश्विनी लहाने यांच्यासह कॅन्सर व्हॅनमधील वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मोहिमेदरम्यान स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गर्भाशय मुख व स्तन कर्करोगाची तपासणी, तर दंतचिकित्सकांकडून तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत संशयित आढळणाऱ्या रुग्णांची नोंदणी करून त्यांना पुढील निदान व उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

गावपातळीवरील समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांना तपासणीसाठी प्रोत्साहित करून मोहिमेच्या यशासाठी सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. यावेळी बोलताना डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी कर्करोगाचे लवकर निदान हे प्रभावी उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नागरिकांनी मोफत तपासणी सुविधेचा लाभ घेऊन नियमित आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारी ही मोहीम जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

000000

 

संबंधित पोस्ट

जलजन्य आजार नियंत्रणात: अमरावती जिल्ह्याचा ‘शून्य उद्रेक’ उद्देश यशस्वीपणे साध्य…

vishwatmaklokswamivarta

लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी अधिक दक्षतेने काम करा,टीबी मुक्त भारत व पल्स पोलिओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

हिंद-दी-चादर” अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरांचा 6 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta

मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिवस साजरा

vishwatmaklokswamivarta