vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक पोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेदरम्यान काही नागरिकांनी तिघांना डांबून ठेवले होते, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केले आह

दि. ९ जुलै रोजी दुपारी ड्रोन उडविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता संबंधितांकडे परवानगी नसल्याचे आढळले. शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ नोंदविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी दिली आहे.

तसेच याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले की, चामोर्शी परिसरात भूमी संपादनाला दोन महिन्यांसाठी स्थगिती असून, सध्या त्या संदर्भात कोणतीही प्रशासकीय कारवाई सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा व सुरक्षा व्यवस्थेची पायमल्ली करू नये. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, कायदा हातात घेण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

vishwatmaklokswamivarta

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनामका खरेदीकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी…

vishwatmaklokswamivarta

मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न..

एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन· आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील दहा वर्षांत महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत गडचिरोली असेल

vishwatmaklokswamivarta