vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

अलिबाग प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड मार्फत बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाभार्थ्यांना रिक्षा व यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) डॉ. रविंद्र शेळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,श्री देवकाते , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, विजयकुमार कुलकर्णी,महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जी. एस. हरळय्या, तसेच विविध बँक व उद्योग केंद्रांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा उद्योग केंद्र, रायगडसाठी प्राप्त 744 प्रकरणांपैकी 755 प्रकरणांना बँकेकडून मंजुरी मिळाली असून उद्दिष्टांच्या 100% हून अधिक पूर्तता करण्यात आली आहे. यशस्वी नियोजन व मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तसेच बीज भांडवल कर्ज योजनेतील उद्दिष्टेही 100% पूर्ण करण्यात आली आहेत.

या योजनेंतर्गत ऑटो रिक्षा व्यवसायासाठी श्री. विरेद्र देवराम टिके, श्री. वैभव नामदेव जिते आणि श्री. पांडुरंग रामा जायनाखवा (रा. अलिबाग) यांना स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र, अलिबाग शाखेमार्फत कर्ज मंजूर करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत श्रीमती. मुग्धा महेंद्र तुपे यांना बँक ऑफ बडोदा, अलिबाग शाखेकडून अनुदानाच्या सहाय्याने सोडा वॉटर व्यवसायासाठी यंत्रसामग्री प्रदान करण्यात आली.

राज्य शासनाच्या या योजनांमुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असून, त्यांना आर्थिक स्थैर्य व विकासाच्या दिशेने मार्गदर्शन मिळत आहे.

000000

संबंधित पोस्ट

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यामुळे वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी आपल्या जनावरांची सुरक्षितता राखावी आणि रात्री एकटं बाहेर पडू नये असं आवाहन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर   राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा..

vishwatmaklokswamivarta

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

उपराष्ट्रपती पदासाठी इंडि आघाडीचे बी.सुदर्शन रेड्डी अर्ज दाखल

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta