दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे किल्ले रायगड येथे रविवार, दि.11 जानेवारी 2026 रोजी गडरोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी केले आहे.
बक्षिस प्रत्येक गटासाठी पुढीलप्रमाणे :- पुरुष प्रथम गट, वयोगट 14 वर्षापर्यंत 1/1/2012 नंतर, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार. पुरुष द्वितीय गट, वयोगट 14 पूर्ण ते 17 वर्षांपर्यंत 01/01/2009 ते 31/12/2011, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार. पुरुष तृतीय गट, वयोगट 17 पूर्ण ते 21 वर्षांपर्यंत 01/01/2005 ते 31/12/2008, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार. पुरुष चतुर्थ गट, वयोगट 21 ते 30 वर्षांपर्यंत 01/01/1996 ते 31/12/2004, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार. पुरुष पाचवा खुला गट, खुला 31/12/1995 आधीचे सर्व, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार.
महिला प्रथम गट, वयोगट 14 वर्षापर्यंत 1/1/2012 नंतर आजपर्यंत, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार.
महिला द्वितीय गट, वयोगट 14 पूर्ण ते 17 वर्षांपर्यंत 01/01/2009 ते 31/12/2011, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार.
महिला तृतीय खुला गट, खुला 31/12/2008 पूर्वीचे सगळे, पहिले बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.4 हजार, तिसरे बक्षिस रु.3 हजार, चौथे बक्षिस रु.2 हजार, पाचवे बक्षिस रु.1 हजार
प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धा मार्ग चित्त दरवाजा-महादरवाजा-होळीचा माळपर्यंत. दि.11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.00 वा. प्रवेश शुल्क रु.40/-, नावे नोंदणी शनिवार दि.10 जानेवारी 2026 संध्याकाळी 5.00 वा. पाचाड धर्मशाळा येथे. भोजन व्यवस्था विनाशुल्क शनिवार, दि.10 जानेवारी. अल्पोपहार रविवार दि.11 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. पारितोषिक वितरण दि.11 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. किल्ले रायगड येथे. प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे वितरण श्री शिवपुण्यतिथी दिनी गुरुवार, दि.2 एप्रिल 2026 रोजी रायगड येथे राजदरबारात होईल.