पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा..
सांगली, प्रतिनिधी: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, दि. १ मार्च २०२५ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. १ मार्च रोजी सकाळी ५.३५ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी ५.४५ वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी ८.२० वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून ओटू पार्क मिरजकडे प्रयाण. सकाळी ८.३० वाजता ओटू पार्क मिरज येथे आगमन व रूग्णसेवा प्रकल्पस्थळी भेट, स्थळ – आदर्श हौसिंग सोसायटी, ओटू पार्क जवळ, मिरज. सकाळी ९ वाजता पद्यावती पार्क, आळतेकर हॉलच्या मागे, मालगाव वेस मिरज येथे आगमन व श्री. पांडुरंग मार्तंड कोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सोयीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.१५ वाजता क्राईम टास्क फोर्स आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे राखीव. सकाळी ११.१५ वाजता सांगली मिरज कुपवाड शहर मनपा विभागनिहाय आढावा, स्थळ – सांगली मिरज कुपवाड शहर मनपा राजवाडा चौक, सांगली. दुपारी १२.१५ वाजता शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी १.३० वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून रेठरे धरण ता. वाळवा कडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता म्हसोबा मंदिर रेठरे धरण येथे आगमन व रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी व भव्य बैलगाडी शर्यत कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता वडगाव, ता. हातकणंगले कडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता ०२ पार्क नॉर्थ, अर्बन रिपब्लिक टाऊनशिप मिरज येथे आगमन व सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित लोकसभा व विधानसभा नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. सोयीनुसार ०२ पार्क नॉर्थ येथून बालगंधर्व नाट्यगृह मिरजकडे प्रयाण. सायंकाळी सोयीनुसार बालगंधर्व नाट्यगृह, विजापूर वेस, मिरज येथे आगमन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित लावणी महोत्सव २०२५ कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथून कोथरूड, पुणे निवासस्थानाकडे प्रयाण.
० तर राहुल नार्वेकर यांचा: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे शनिवार, दि. 1 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 1 मार्च रोजी दुपारी 2.45 वाजता सांगली येथे आगमन व पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन, स्थळ – गणपती पेठ, सांगली), नंतर श्रीगणपती मंदिरात दर्शन. स्व. चिंतामणराव पटवर्धन यांच्या समाधी स्थळास अभिवादन, स्थळ – कृष्णा नदी काठाजवळ, सांगली. दुपारी 3.15 वाजता भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय सांगली येथे सदिच्छा भेट व राखीव. सायंकाळी 4 वाजता भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय सांगली येथून मिरजकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्र सांगली-मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल रस्त्याचे उदघाटन. श्री. समित कदम यांचे निवासस्थान, कदम बंगला, शिवाजी नगर, मिरज येथे चहापान व राखीव. शासकीय विश्रामगृह मिरज येथे राखीव. सायंकाळी 5.30 वाजता सांगली जिल्हा समस्त ब्राम्हण समाज, सांगली यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील नवनिर्वाचित सर्व खासदार तसेच आमदारांचा सत्कार समारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, स्थळ – 02 पार्क नॉर्थ, अर्बन रिपब्लिक टाऊनशिप मिरज. रात्री 8 वाजता मिरज संस्थानचे श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन सरकार यांच्या देवी भवन पॅलेस येथे प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – देवी भवन पॅलेस मिरज. रात्री सोयीनुसार मिरज येथून कोल्हापूरकडे प्रयाण.
तसेच राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे शनिवार, दि. 1 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्, सांगली-मिरज रोड, सांगली कडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळा तसेच संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् चे सौहार्द-2025 स्नेहसंमेलन उदघाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्, सांगली-मिरज रोड, सांगली. दुपारी 3 वाजता कवलापूर हेलिपॅड येथून पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण.