vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील माझगाव परिसरात गणेश मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याच्या प्रकरणात दानिश शेर खानला अटक

मुंबईतील माझगाव परिसरात गणेश मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याच्या प्रकरणात दानिश शेर खानला अटक

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईतील माझगाव परिसरात गणेश मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याच्या प्रकरणात दानिश शेर खानला अटक करण्यात आली आहे.माझगावचा मोरया गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती मिरवणूक परिसरातून जात असताना हा प्रकार घडला. मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तीवर अंडे पडल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दानिश शेर खान हा ऑनलाइन अंडी डिलिव्हरीसाठी इमारतीत गेला होता. त्याचवेळी मिरवणुकीत फटाके फोडल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे त्याच्या डोळ्यांना त्रास झाला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकली.

या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच विशेष पथके तयार केली होती. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि घटनेनंतर सुमारे 36 तासांनी दानिश शेर खानला अटक करण्यात आली.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार…

vishwatmaklokswamivarta

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत- मंत्री नितेश राणे

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती